Friday, 30 September 2011

एकगठ्ठा एसएमएसवर बंदीचा फेरविचार

कपिल सिब्बल यांचे आदित्य ठाकरे यांना आश्‍वासन
नवी दिल्ली, दि. 30 (विशेष प्रतिनिधी) - दिवसाला शंभरपेक्षा जास्त एसएमएस करण्यास दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने घातलेल्या सरसकट बंदीचा सरकार फेरविचार करेल आणि एसएमएसची संख्या वाढविण्याचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे ठोस आश्‍वासन केंद्रीय दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना आज दिले.
एकगठ्ठा एसएमएसवर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय ‘ट्राय’ने घेतला आहे. हा निर्णय व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याने त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा युवा सेनेने दिला होता. यासंदर्भात युवा सेनेची भूमिका मांडण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आज नवी दिल्लीत कपिल सिब्बल यांची भेट घेतली..............

No comments:

Post a Comment